येवल्यात चोरट्यांनी लंपास केल्या ३ लाखांच्या पैठण्या

येवल्यात चोरट्यांनी लंपास केल्या ३ लाखांच्या पैठण्या

घटनास्थळाची पोलिसांनी पाहणी केली तेव्हा नागरिकांचीही मोठी गर्दी झाली होती.

पैठणीचे माहेरघर असलेल्या येवल्यात चोरट्यांनी तीन लाख रुपयांच्या पैठणी साड्यांची चोरी केल्याची घटना सोमवारी, ६ मे रोजी उघडकीस आली. आश्चर्याची बाब म्हणजे चोरटे दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसमोर नाचले.

येवला-कोपरगाव रस्त्यावरील नाकोड या भव्य दालनात ही चोरी झाली. या ठिकाणी पैठणींची निर्मिती आणि विक्रीही होते. रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी शटर तोडून आत प्रवेश करत उच्च किंमतीच्या सुमारे ३ लाख रुपये किंमतीच्या पैठणी साड्या चोरल्या. हातमागावर तयार करण्यासाठी लावलेल्या साड्यादेखील चोरट्यांनी लंपास केल्या. पोलिसदेखील या प्रकारामुळे बुचकळ्यात पडले असून, अधिक तपास सुरू आहे. या प्रकारामुळे व्यावसायिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे.

माय महानगरच्या बुलेटीनमध्ये बघा चोरीचा व्हिडिओ…

First Published on: May 6, 2019 2:05 PM
Exit mobile version