टोलचा झोल, केंद्र सरकारलाच कोट्यवधींचा गंडा

टोलचा झोल, केंद्र सरकारलाच कोट्यवधींचा गंडा

सातत्याने वादात सापडत असलेल्या पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावरील अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणालाच कोट्यवधींचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. टोल प्रशासनाने या घोटाळ्याची कबुली दिली असून, परस्पर सॉफ्टवेअरमध्ये बदल करत पैशांची लूट केल्याचा आरोप निफाड भाजपचे पदाधिकारी यतीन कदम यांनी केलाय.

मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव टोल नाक्यावर गोंदे ते शिरवाडे दरम्यानच्या धावणाऱ्या वाहनांकडून टोल वसूली केली जाते. टोल कलेक्शनची जबाबदारी स्कायलार्क कंपनीकडे सोपवण्यात आलीय. त्यासाठी केंद्रीय मंत्रालयाकडून वाहन नावाचं सॉफ्टवेअर देण्यात आलंय. टोलनाक्यावरून जेवढी वाहनं जातील त्यांची माहिती वरिष्ठ यंत्रणेला समजते. मात्र, लॉकडाऊनदरम्यान केंद्र सरकारने टोल नाक्याला दररोज ३४ लाखांची सूट दिली होती. याचाच गैरफायदा घेत या टोलवरील २ आणि १४ क्रमांकाच्या लेनमध्ये वाहनऐवजी दुसरंच सॉफ्टवेअर सुरू करत टोलनाका प्रशासन अधिकाऱ्यांनी लूट सुरू केली. यासंदर्भातील माहिती मिळताच यतीन कदम यांना लागताच त्यांनी आक्रमक होऊन पिंपळगाव टोल नाका गाठत अधिकारी-कर्मचाऱ्यांना जाब विचारला. यतिन कदम यांनी वरिष्ठ कार्यालयात संपर्क साधत यासंदर्भात माहिती दिली. वरिष्ठ येईपर्यंत धरणं आंदोलन सुरू केलं.

First Published on: September 16, 2021 6:03 PM
Exit mobile version