नाशिकमध्ये प्लास्टिकच्या गोदामाला आग

नाशिकमध्ये प्लास्टिकच्या गोदामाला आग

प्रातिनिधीक फोटो

नाशिक शहरातील वडाळा गाव परिसरातील मेहबूब नगर येथील भंगाराच्या प्लास्टिकच्या गोदामाला रविवारी रात्री 9 वाजेदरम्यान अचानक आग लागली. आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट मोठया प्रमाणावर दिसू लागताच बघ्यांची गर्दी झाली होती. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान बंबासह दाखल झाले होते. जवानांनी आग आटोक्यात आणली आहे.

First Published on: May 16, 2021 11:27 PM
Exit mobile version