दिनकर पाटलांचे आंदोलन पोलिसांनी मोडले

दिनकर पाटलांचे आंदोलन पोलिसांनी मोडले

महापालिका सभागृहात बसलेल्या दिनकर पाटलांसह अन्य दोघांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस सभागृहात दाखल झाले होते.

धार्मिक स्थळे हटवण्याची मोहीम, मिळकतीचे धोरण आणि सेंट्रल किचनचा ठेका स्थानिक बचतगटांना देण्याच्या मागणीसाठी महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवक तथा सभागृह नेता दिनकर पाटील यांनी मंगळवारपासून (दि. २५ जून) महापालिकेच्या सभागृहात सुरू केलेले ठिय्या आंदोलन अखेर पोलिसांनी मोडून काढले. दिनकर पाटील यांच्यासह त्यांना सक्रिया पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार व रवींद्र धिवरे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

First Published on: June 28, 2019 4:31 PM
Exit mobile version