बॅरिकेडस गाडीने उडवत धिंगाणा घालणारा पोलीस निलंबित  

बॅरिकेडस गाडीने उडवत धिंगाणा घालणारा पोलीस निलंबित  

मद्यपान करून धिंगाणा घालत आडगावनाका परिसरात पोलीसांनी लावलेले बॅरिकेडस गाडीने उडवणार्‍या पोलीस सेवकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महामार्ग वाहतुक पोलीसचे अधीक्षकांनी ही कारवाई केली. अभिनव अरूण नाईक (38, नेमणुक महार्मा वाहतुक पोलीस, पिंपळगाव पथक) असे कारवाई करण्यात आलेल्या संशयित पोलीस सेवकाचे नाव आहे. त्याचे साथीदार रमेश अय्यर, प्रविण पांडव व चेतन रायकर यांच्यावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरजिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरूआहे. जिल्ह्यात येणार्‍या व बाहेर पडणार्‍या नागरीकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध मार्गांवर बॅरेकेटींग करून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  13 एप्रिल रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास टाटा नॅक्सन कंपनीची (एमएच 14, जीवाय 8018) चारचाकी भरधाव वेेगात येऊन आडगावनाका येथे बॅरेकेटस तोडून पळून जात होती. या गाडीस  बिटको चौक परिसरात नाशिकरोड पोलीसांनी पकडले. परंतु यातील संशयित नाईक व त्याच्या सहकार्‍यांनी पोलीसांसी हुज्जत घालत धिंगाणा घातला. अखेर पोलीसांनी त्यांना अटक केली होती. दरम्यान, नाईका हा महामार्ग वाहतुक पोलीसमध्ये कार्यरत असल्याचे समोर आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर  महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांनी नाईक यास निलंबित केले आहे.

First Published on: April 16, 2020 8:07 PM
Exit mobile version