भुजबळ-कांदेप्रकरण : पोलीस पाठवणार समन्स

भुजबळ-कांदेप्रकरण : पोलीस पाठवणार समन्स

नाशिक – पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात वाद उफाळून आला आहे. याप्रकरणी आता नाशिक शहर पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी रेकॉर्डिंगसह टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले आहेत. चौकशीसाठी आमदार कांदे आणि छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे यांना समन्स बजावण्यात येणार आहे. पोलीस निरीक्षकांमार्फत चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दिली.

आमदार सुहास कांदे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर निधी विकल्याचा आरोप करत याचेे पाचशे पुरावे देऊ शकतो, असाही दावा त्यांनी केला आहे. त्यानंतर सुहास कांदे यांनी आपला मोर्चा कोर्टाकडे वळवत भुजबळांविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारीदेखील प्रतिवादी आहेत. याप्रकरणी आमदार कांदे यांना छोटा राजनच्या पुतण्याने धमकीचा कॉल केल्याची तक्रार कांदे यांनी गंगापूर पोलीस आणि पोलीस आयुक्त पाण्डेय यांच्याकडे केली आहे. त्यानुसार पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले असून, पोलिसांनी आमदार कांदे यांना समन्स पाठवले आहे.

First Published on: October 1, 2021 7:25 AM
Exit mobile version