जिल्ह्यात १० दिवसांत ११ सहकारी संस्थांचे मतदान; ‘इतक्या’ झाल्या बिनविरोध

जिल्ह्यात १० दिवसांत ११ सहकारी संस्थांचे मतदान; ‘इतक्या’ झाल्या बिनविरोध

नाशिक : जिल्ह्यातील सहकारी संस्थाच्या निवडणुकांनी राजकीय वातावरण ढवळून निघालेले असताना येत्या १० दिवसांत तब्बल ११ महत्वाच्या सहकारी संंस्थांसाठी मतदान होणार आहे. केवळ १० संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने निवडणुकीच्या निमित्ताने सहकार विभागाचे कामही वाढले आहे.

सहकारी संस्था, बँकांना सहकार विभागाचा कणा समजला जातो. कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल आता वाजल्यामुळे जिल्ह्यातील ४२ संस्थांची निवडणूक येत्या काळात होत आहे. त्यातील २० संस्थांसाठी येत्या ६ आणि १३ तारखेला विविध ठिकाणी मतदान होणार आहे. नाशिक जिल्हा ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था, मायको एम्लॉईज को-ऑप क्रेडीट सोसायटी सातपूर, एच. ए. एल.एप्लॉईज को-ऑप क्रेडीट सोसायटीसाठी शनिवारी (दि.१२) मतदान होणार आहे. याव्यतिरीक्त इतर सर्व संस्थांचे मतदान हे रविवारी होत असल्याने वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी येत्या रविवारी (दि.6) मतदान होत असल्याने प्रचार शिगेला पोहोचला आहे. एकूण १५ जागांसाठी तब्बल ४२ उमेदवार रिंगणात असले तरी ‘आपला पॅनल’ व ‘सहकार पॅनल’ यांच्यात सरळ लढत रंगणार असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील पंचायत समित्यांसह आरोग्य केंद्रातील मतदार यात सहभागी होणार असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची चांगलीच दमच्छाक झाली. तसेच जिल्ह्यातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून लौकिक असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज सेवक सहकारी पतसंस्थेसाठी रविवारीच मतदान होत असल्याने या निवडणुकीतही चुरस निर्माण झाली आहे. त्यासोबतच समर्थ सहकारी बँक, जनलक्ष्मी बँक, येवला मर्चंट को-ऑप बँकांची निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

यांचा वाजला बिगूल

बिनविरोध झालेल्या संस्था

First Published on: November 5, 2022 1:17 PM
Exit mobile version