गॅस दरवाढीमुळे फराळाची चवही महागणार

गॅस दरवाढीमुळे फराळाची चवही महागणार

नाशिक : दिवाळीच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच पाहुण्यांच्या पुढ्यात ठेवण्यात येणार्‍या फराळासाठी नाशिकमधील मिठाईची दुकाने सजली आहेत. चकली, अनारसे आणि रूचकर चिवडा ही नावे जरी घेतली तरी, तोंडाला पाणी सुटते. मात्र यंदा महामागाईचा फटका रेडिमेड फराळालाही बसला आहे. गॅसची झालेली दरवाढ यामुळे तयार फराळाच्या दरात सुमारे १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

नागरिकांना कामाच्या व्यापामुळे सर्व पदार्थ घरी बनवणे शक्य होत नाही. त्यामुळे नोकरदार कुटुंबांना बाहेरून फराळ घेणे सोयीचे झाले आहे. त्यामुळे हे पदार्थ बाजारात विकत घेण्याकडे नागरिकांचा अधिक कल असतो. शहरात अनेक ठिकाणी फराळाच्या पदार्थांचे स्टॉल लागले असून, त्यातील निवडक दुकानांमध्ये फराळासाठी गर्दी होत आहे. परंतू महामागाईमुळे तयार फराळही महागला आहे. येत्या काही दिवसांतच घरांमध्ये दिवाळीचे आगमन होणार आहे. त्यासाठी विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ तयार करण्याला गती आली असून, लाडू, शंकरपाळे, अनारसे, करंजी, चिरोटे, साटोरी, रवा लाडू, बेसन लाडू, चकली या पदार्थांना मागणी आहे. सणाच्या कालावधीत घरोघरी पाहुण्यांची वर्दळ असते. त्यांच्या पाहुणचारासाठी विविध प्रकारच्या चिवड्यांनाही चांगली मागणी आहे. पातळ पोहे, भाजके पोहे, दगडी पोह्यांचा चिवडा, नाशिक चिवडा, मका चिवडा बाजारात उपलब्ध आहे.

फरसाणचे विविध प्रकारही बाजारात उपलब्ध आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा भावात किरकोळ वाढ झाली आहे. किराणा मालाच्या दरात काहीअंशी वाढ झाली आहे. तेलाच्या दराचा भडका उडाला आहे. त्यातच व्यावसायिक गॅस सिलिंडर दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने यंदा तयार फराळाच्या दरातही सुमारे दहा ते पंधरा टक्के वाढ झाली आहे. महागाईमुळे फराळ दिवाळीच्या फराळाला महागाईची झळ बसत आहे. – सुहास अष्टपुत्रे, भगवंतराव मिठाई

 

First Published on: October 26, 2021 10:34 AM
Exit mobile version