२० टक्के अनुदानाचा प्रश्न शिक्षणमंत्र्यांच्या कोर्टात

२० टक्के अनुदानाचा प्रश्न शिक्षणमंत्र्यांच्या कोर्टात
   डॉ. आमदार तांबेंच्या मध्यस्थीने मुख्याध्यापक संघाची पायी दिंडीयात्रा स्थगित-   
     राज्यातल्या उच्च माध्यमिक शाळांना त्यांचे थकीत असलेलं २० टक्के अनुदान त्वरित मंजूर करावं, त्यासाठी राज्य सरकारनं निधी द्यावा आणि नियमितपणे अनुदानाची रक्कम वर्ग व्हावी, यासाठी शासननिर्णय जाहीर करावा, या मागण्यांसाठी राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती संघटनेने सप्टेंबरपासून पायी दिंडी काढली होती. दरम्यान, आमदार सुधीर तांबे यांच्या मध्यस्थीने संघटनेच्या शिष्टमंडळाला मुंबईत चर्चेसाठी बोलावण्यात आल्यानं पायी दिंडी यात्रा स्थगित करण्यात आलीय. आमदार किशोर दराडे यांच्या कार्यालयात निवेदन देऊन ही रॅली येवल्याहून ७० किलोमीटरचं अंतर पूर्ण करुन संगमनेरमध्ये पोहोचली. कृती समिती अध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी आंदोलनाची दखल घेत कृती समितीचा अहवाल कॅबिनेटसाठी सुपूर्द केला.
First Published on: October 5, 2020 4:42 PM
Exit mobile version