एकीला लग्नाचे आमिष देत बलात्कार अन् दुसरीशी प्रेमविवाह

एकीला लग्नाचे आमिष देत बलात्कार अन् दुसरीशी प्रेमविवाह

पुण्यात कबड्डीपटू मुलीची हत्या करणारे ३ नराधम १२ तासात पोलिसांच्या ताब्यात

लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार करुन फरार झालेल्या संशयित आरोपीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पोलीस तपासात आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून दुसरीशीच लग्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रशांत मिलिंद भालेराव (वय २५, रा.अरिंगळे मळा, नाशिकरोड, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

संशयित प्रशांत भालेराव व तक्रारदार महिला एकमेकांच्या शेजारी राहतात. कोरोनामुळे मुंबईस्थित विधवा महिला आपल्या मुलांना घेऊन सासरी आली होती. सासूच्या माध्यमातून मे २०२० मध्ये संशयिताची व पीडित महिलेची ओळख झाली. अविवाहित असून, लग्न करुन मुलांना आपले नाव लावेल, असे आश्वासन दिले. त्यानंतर विश्वास संपादन करुन त्याने मे ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. अचानक तो पसार झाल्याने पीडितेने त्याचा शोध घेतला असता त्याने प्रेमविविवाह केल्याचे समोर आले. याप्रकरणी पीडित महिलेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही बाब त्याला समजताच तो झाला. नाशिकरोड पोलीस व गुन्हे शाखा युनीट दोनच्या पथकाने समांतर तपास सुरु केला. आठ महिन्यांतर त्याचा ठावठिकाणा पोलिसांना लागला. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याला गुन्हे शाखा दोनच्या पथकाने ताब्यात घेत नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

First Published on: August 5, 2021 5:53 PM
Exit mobile version