दारु, गांजा पाजून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

दारु, गांजा पाजून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

प्रातिनिधिक छायाचित्र

महिलेला दारू, गांजा पाजून आणि मोबाईलचे रेकॉर्डिंग घरच्यांना पाठवण्याची धमकी देत तब्बल महिनाभर अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने नाशिकरोड पोलीस ठाण्यात नराधमाविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयित नीलेश उर्फ पप्पु गांगुर्डे यास अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑगस्ट २० सप्टेंबर या कालावधीत नराधम अल्पवयीन मुलीस बळजबरीने वेळोवेळी दारू व गांजा पाजायचा. तो तिला त्याच्या आजोबांच्या घरी बोलवायचा. तिच्या आजी व भावाला मारण्यासह मोबाइलवरील रेकॉर्डिंग घरच्यांना पाठवण्याची धमकी देत तो पीडितेला मारहाण करत तिच्यावर बलात्कार करायचा. त्याचा त्रास असहाय्य झाल्याने महिलेने पोलीस ठाण्यात येत आपबिती सांगितली. त्यानुसार पोलिसांनी अटक करत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

First Published on: September 23, 2020 4:24 PM
Exit mobile version