कोरोना प्रतिबंधाची जबाबदारी प्राथमिक शिक्षकांच्या माथी

कोरोना प्रतिबंधाची जबाबदारी प्राथमिक शिक्षकांच्या माथी

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हा नवा उपक्रम हाती घेतला असून, त्यासाठीच्या सर्व्हेक्षणाची जबाबदारी प्राथमिक शिक्षकांवर सोपवली आहे. मात्र, सरकारच्या अनेक उपाययोजनांचा भार हा केवळ प्राथमिक शिक्षकांच्याच माथी मारला जात असल्याचे सांगत प्राथमिक शिक्षक संघटनांनी मात्र या आदेशाला तीव्र विरोध केला आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने आता ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ हा नवा उपक्रम सुरू केलाय. या माध्यमातून शहरातल्या १९ लाख कुटुंबांचं सर्व्हेक्षण केलं जाणार आहे. या सर्वेक्षणाची जबाबदारी महापालिका क्षेत्रातल्या प्राथमिक शिक्षकांवर सोपवण्यात आलीय. मात्र, राज्य सरकारकडून माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षकांऐवजी वारंवार आपल्यावरच जबाबदारी सोपवली जात असल्याचे सांगत प्राथमिक शिक्षक संघटनांनी या कामाला कडाडून विरोध केलाय. आम्ही रिकामे बसलेलो नाही. आमच्यावरही शिक्षण आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी असल्याचे संघटनांचं म्हणणं आहे. सर्वेक्षणादरम्यान बाधित झाल्यास सुरक्षिततेचे काय, असा प्रश्न उपस्थित करत सर्वेक्षण करणारच नाही, अशी भूमिका संघटनांनी घेतलीय.

First Published on: September 24, 2020 7:30 PM
Exit mobile version