अपघात रोखण्यासाठी होणार रस्त्यांचे मॅपिंग

अपघात रोखण्यासाठी होणार रस्त्यांचे मॅपिंग

महामार्गावर होणारे वाढते अपघात विचारात घेता हे अपघात रोखण्यासाठी जिल्हाधिकारयांकडे झालेल्या बैठकीत महामार्गावरील धोकादायक ठिकाणांचे मॅपिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण विभाग (प्रकल्प), वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन या तीनही विभागांच्या मदतीने हे मॅपिंग करण्यात येउन उपाय योजना करण्यात येणार आहे.

शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या के.के.वाघ महाविद्यालय ते जत्रा चौफुलीच्या दीड किलोमीटर मार्गावर सध्या उड्डाणपुल आणि अंडरपासचे काम संथ गतीने सुरू आहे. या मार्गावरल वाढत्या अपघातांच्या घटना लक्षात घेत या ठिकाणी उड्डाण पुल उभारण्याचा निर्णय रास्ते प्राधिकरण विभागांनी घेतला आहे. साधारणपणे ऑक्टोबर २०२० पर्यंत या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणार आहे. मात्र या महामार्गावर महाविद्यालयीन विद्यार्थी,जेष्ठ नागरिक,कामगार वर्ग आणि जडअवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच के.के.वाघ महाविद्यालयाच्या प्रवेशद्वार मुख्य रास्ता बंद केला असल्यामूळे या महाविद्यालयाच्या प्रवेशव्दारावर नेहमीच वाहतूक कोंडी निर्माण होते. के .के.वाघ ते जत्रा चौफुलीच्या या संपूर्ण समांतर रस्त्यावरच दोन्ही बाजूंनी उंच गतिरोधक टाकल्याने छोटे-मोठे अपघात रोखण्याचे आव्हान आहे.

या महामार्गावरील परिसरात अनेक व्यवसायकांनी अतिक्रमणे करून आपली दुकाने थाटली असल्याने आणि मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडते. या सर्वच ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन अपघातात दिवसेंनदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभुमीवर या मार्गाचे मॅपिंग करण्यात येउन उपाययोजना आखण्यात येणार आहे.

गतिरोधक टाकण्याची मागणी

रासबिहारी चौफुली वर चारही दिशेने प्रचंड वाहतूक कोंडी सतत असते त्यातच सदर परीसरात महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या युवक-युवती धुम स्टायल वाहने चालवितात.याचं महामार्गावर अनेक ठिकाणी चुकीचे गतिरोधक तयार करण्यात आले असताना सर्वात जास्त अपघात प्रवण क्षेत्र असून या ठिकाणच्या एका दिशेला गतिरोधक नसल्याने या ठिकाणचे वाहतूक पोलीसच वाहनांचा आणि अपघात कमी करण्यासाठी गतिरोध टाकण्याची मागणी करीत आहेत.

First Published on: August 6, 2019 4:21 PM
Exit mobile version