वारसास्थळांना श्रद्धांजली वाहत सत्याग्रह आंदोलन

वारसास्थळांना श्रद्धांजली वाहत सत्याग्रह आंदोलन

पंचवटी : स्मार्ट सिटी अंतर्गत गोदाघाट सुशोभिकरण कामांतर्गत गोदाकाठचा पुरातन ठेवाच नष्ट करण्याचे काम सुरू असल्याच्या निषेधार्थ गोदाप्रेमी एकवटले आहेत. स्मार्ट सिटीच्या या अनागोंदी कारभाराविरोधात शनिवारी यशवंतराव महाराज पटांगणावर ऐतिहासिक वारसास्थळांना श्रध्दांजली अर्पण करत सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

गोदापात्रातील दुतोंड्या मारुती सांडव्यापासून ते खंडोबा कुंड यादरम्यान काँक्रिट काढण्याचे काम करण्यात आले. हे काम करताना सांडव्यावरील देवी मंदिरामागे असलेला पुरातन सांडवा तोडण्यात आला. याचबरोबर यशवंत महाराज पटागंणाच्या बाजूने गोदापात्राकडे जाण्यासाठी असलेल्या पायर्‍यादेखील काही महिन्यांपूर्वी तोडण्यात आलेल्या होत्या. तर, दुसरीकडे नीलकंठेश्वर मंदिराच्या परिसरात थेट जेसीबी लावत कामे केल्यामुळे अनेक मंदिरांना तडे गेले आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी करुनही स्मार्ट सिटीकडून याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. स्मार्ट सिटीद्वारे सुशोभिकरणाच्या नावाखाली पुरातनस्थळांचे नुकसान केले जात असल्याने यामुळे नाशिककरांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी गोदाप्रेमी सेवा समितीच्या वतीने शनिवारी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

यावेळी स्मार्टसिटी मुर्दाबाद, स्मार्टसिटीचे कामे बंद करा अशा घोषणा दिल्या. यानंतर स्मार्ट सिटीने तोडलेल्या पायर्‍यांवर पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. एकच ध्यास… मोकळा व्हावा गोदावरीचा श्वास.. अशा आशयाचा भव्य फलक उभारण्यात येऊन स्मार्ट सिटी प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी यावेळी मामा राजवाडे, रामसिंग बावरी, गिरीष नवसे, रघुनंदन मुठे, सुहास भगने, नरेंद्र धारणे, सागर देशमुख, कैलाश देशमुख, गणेश कमरे,श्रीधर व्यवहारे, चिराग गुप्ता, धनंजय पुजारी, अंबादास खैरे, सतीश शुक्ल, बाळासाहेब कोकणे, अनिकेत शास्त्री, संदीप भानोसे, अजिंक्य गिते, नवनाथ जाधव, दिपक मंडलिक, संदीप सिनकर, किरण पानकर, नरेंद्र धारणे आदींसह नाशिककर उपस्थित होते.

या आहेत मागण्या..

First Published on: December 11, 2022 9:08 AM
Exit mobile version