पोस्ट व्हायरल होताच ‘एसबीआय’ ताळ्यावर

पोस्ट व्हायरल होताच ‘एसबीआय’ ताळ्यावर

स्टेट बँक ऑफ इंडिया

बहिणीच्या वयोवृद्ध सासर्‍यांच्या शस्त्रक्रियेसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गंगापूर शाखेतील ग्राहक प्रमोद गायकवाड यांनी ३० मार्चला ऑनलाइन तिच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या खात्यावर ४५ हजार रूपये पाठवले. ग्राहकाने अनेकवेळा बहीण अ‍ॅड. अरूंधती डुंबरे यांच्या खात्यावर ऑनलाइन पैसे पाठवले असतानाही यावेळी पैसे दुसरीकडेच गेले. याप्रकरणी गायकवाड यांनी सोशल मिडीयावर पोस्ट टाकली. ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गंगापूर शाखेने खात्यावर पैसे जमा केले.

गायकवाड यांनी बँक मॅनेजर व कर्मचार्‍यांकडे चौकशी असता ग्राहकाचीच चूक असे सांगण्यात आले. प्रमोद गायकवाड यांनी टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवली, कस्टमर केअरला ईमेल पाठवून सविस्तर तक्रार दिली, पण आभाराशिवाय कोणतेच त्यांना उत्तर मिळाले नाही. अखेर त्यांनी एसबीआयकडून होणार्‍या मनस्तापाबाबत सोशल मिडीयावर पोस्ट अपलोड केली. त्यास प्रतिसाद मिळाला. अनेकांनी बँकेच्या गलथान कारभाराविरोधात प्रतिक्रिया दिल्या. एसबीआयची बदनामी होत असल्याचे समजताच गंगापूर शाखेने सावध पवित्रा घेत त्यांच्या खात्यावर पैसे जमा केले.

First Published on: April 13, 2019 7:45 AM
Exit mobile version