शाळा बंद, शिक्षण सुरू

शाळा बंद, शिक्षण सुरू

नाशिक : शाळा बंद असल्यामुळे वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन पाडळी पातळेश्वर विद्यालयातील शिक्षकांनी शाळा बंद शिक्षण सुरु हा उपक्रम हाती घेतला आहे. शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जावून शिक्षण देत आहेत. विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. पाडळी परिसरातील ठाकरवाडी, बोगिरवाडी, पलाट, लिंबाचीवाडी, आडवाडी, दत्तवाडी, आशापूर या भागात जाऊन विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करतात. मुलांना अभ्यासात गुंतवून ठेवण्यासाठी प्रयत्न करतात.

शाळा बंद असल्यामुळे मुलांना शेतात कामाला जावे लागते. त्यामुळे लवकर शाळा सुरू करण्याची मागणी ग्राम पंचायत सदस्य अशोक मेंगाळ, शिवाजी अगिवले, नवनाथ अगिवले, सुजाता अगिवले, राहूल अगिवले यांनी केली. या मोहिमेमध्ये बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. सी. शिंगोटे, एम. एम. शेख, सविता देशमुख, टी. के. रेवगडे, सी. बी. शिंदे, के. डी.गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, ए. बी. थोरे सहभागी होते.

First Published on: January 19, 2022 8:05 AM
Exit mobile version