Nashik पॉलिटेक्निक डिप्लोमासाठी जागा २२ हजार, अर्ज २४ हजार; चुरस वाढली

Nashik पॉलिटेक्निक डिप्लोमासाठी जागा २२ हजार, अर्ज २४ हजार; चुरस वाढली

नाशिक : २०२२-२३ वर्षासाठी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, डिप्लोमा इंजिनीअरिंग प्रवेशासाठी नाशिक विभागात २२ हजार ३३१ जागा आहेत. शुक्रवारपर्यंत (दि.२३) नाशिक विभागात तब्बल २४ हजार ४५८ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. यात नाशिक जिल्ह्यातील ९ हजार ८३३ विद्यार्थी, अहमदनगरमधील ७ हजार ३७३, धुळे ८८८, नंदुरबार ५६६ आणि जळगावमधील ४ हजार ७९८ विद्यार्थी आहेत.

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनीअरिंग प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे. या प्रवेशाचे ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयने प्रसिद्ध केले आहे. ३० जूनपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरण्याची निश्चिती करावी लागणार आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या मार्च-एप्रिल २०२२ या वर्षात दहावी परीक्षा दिली आहे, त्यांनी शैक्षणिक पात्रता तपशीलामध्ये स्वत:चा आसनक्रमांक भरावा आणि शुल्क भरून अर्ज पूर्ण भरावेत. विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या सविस्तर माहितीसाठी https://dte.maharashtra.gov.in या वेबसाइटवर संपर्क साधावा, असेही आवाहन तंत्रशिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

डिप्लोमा प्रवेशप्रक्रियेत महत्वाचे टप्पे

पॉलिटेक्निक प्रवेशाचे वेळापत्रक

First Published on: June 26, 2023 11:38 AM
Exit mobile version