शरद पवार, राजेश टोपे शुक्रवारी नाशिक दौर्‍यावर

शरद पवार, राजेश टोपे शुक्रवारी नाशिक दौर्‍यावर

नाशिक : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे शुक्रवारी (दि.24) नाशिक दौर्‍यावर येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथे दुपारी 2 वाजता महाविकास आघाडीचे नेते व अधिकार्‍यांसोबत बैठक घेणार आहेत. जिल्ह्यात वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर काय उपाययोजना करता येतील, याविषयी या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.
नाशिक जिल्ह्यात रुग्णसंख्या 10 हजारांवर पोहोचली आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शहर लॉकडाऊन करण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे इतर पक्षातील लोकप्रतिनिधींनी त्यासाठी आग्रह धरला होता. मात्र, शहराबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नाशिक दौर्‍यावर येणार असल्याचे भुजबळांनी सांगितले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांचा दौरा अद्याप निश्चित झालेला नसताना आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे हे शुक्रवारी नाशिकमध्ये येणार आहेत. जिल्हाचा आढावा घेवून त्याविषयी अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येते.
मंगळवारी दिवसभरात १४ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात नाशिक शहर ६, नाशिक ग्रामीणमधील ६ आणि जिल्ह्याबाहेरील २ रूग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ४१२वर पोहोचला आहे. जिल्ह्यात १० हजार 25 वर पोहचला आहे. एकट्या नाशिक शहरात 6 हजार 70 रूग्णांचा समावेश आहे.

First Published on: July 22, 2020 2:20 PM
Exit mobile version