शिवसेना : पंचवटीतील १०० महिलांना साडीचोळी

शिवसेना : पंचवटीतील १०० महिलांना साडीचोळी

नाशिक : शिवसेनेचे कार्य घराघरांत पोहोचावे आणि संघटन अधिक मजबूत होऊन जास्तीत जास्त लोक या पक्षाशी जोडले जावेत, हा भगवा सप्ताह राबवण्यामागचा खरा उद्देश असल्याचे शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनापासून राबविण्यात येत असलेल्या भगव्या सप्ताहांतर्गत पूर्व नाशिक महिला आघाडीच्या वतीने निर्मल मंगल कार्यालय (सीतागुंफा, पंचवटी) येथे 100 महिलांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांना साडी-चोळी तसेच मास्क व सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात आले त्यावेळी प्रमुखपाहुणे म्हणून बडगुजर बोलत होते.

भगवा सप्ताहांतर्गत आपले 2 लाख घरांवर भगवा शिवसेनेचा ध्वज आपणास फडकवायचा आहे. पक्षाने दिलेले हे लक्ष्य असल्याने ते पूर्ण करण्यासाठी शिवसैनिकांनी कंबर कसावी आणि त्याद्वारे नागरिकांशी आपुलकीचे नाते निर्माण करावे, असे माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल भाषणात म्हणाले. नाशकात महिला आघाडीच्या मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असून रोज अनेक महिला शिवसेनेत प्रवेश करीत आहेत ही पक्षाच्या उत्कर्षासाठी आनंदाची बाबच म्हणावी लागेल. महिलांना स्वावलंबी बनविण्यात तसेच त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत,असे महिला आघाडीच्या जिल्हा संपर्क संघटक रंजना नेवाळकर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजन मंगला भास्कर, शोभा मगर, ज्योती देवरे, स्वाती पाटील यांनी केले होते. पूर्व नाशिक विधानसभा शिवसेना संपर्कप्रमुख आबासाहेब पतंगे, महिला आघडी संपर्क संघटक संगीता खोडाणा, भाविसे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, महिला आघडी माजी उपजिल्हा संघटक लक्ष्मी ताठे, नगरसेविका रंजना बोराडे, नगरसेवक सुनील गोडसे, महानगर संघटक योगेश बेलदार, विधानसभा संघटक विशाल कदम, उपमहानगरप्रमुख सुनील जाधव, शैलेश सूर्यवंशी, बबलू गोसावी, महेंद्र बडवे उपस्थित होते. कार्यक्रमास द्वारका गोसावी, गुड्डी रंगरेज, शोभा दिवे, प्रज्ञा गायकवाड, श्रध्दा कोतवाल, कल्पना पिगंळे, संजवनी वराडे, सविता म्हस्के, भारती बोढाई, कीर्ती निरगुडे, शोभा रौदंळ, शीतल भदाने, आंजुम खान, पंचवटी विभागातील शिवसेना पदाधिकारी संजय थोरवे, हरीभाऊ काळे, राहुल देशामुख, अशोक जाधव, कल्पेश पिंगळे आदींसह महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या. प्रास्ताविक शोभा मगर यांनी केले तर सूत्रसंचालन सुनील निरगुडे यांनी केले.

First Published on: January 30, 2022 8:35 AM
Exit mobile version