शिवसेनेतर्फे शिवभोजन केंद्राचे उद्घाटन

शिवसेनेतर्फे शिवभोजन केंद्राचे उद्घाटन

नाशिक:बिटको रुग्णालयाशेजारील गोसावी वाडी येथे शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांच्या हस्ते करण्यात आले. करोना महासंकाटाच्या पार्श्वभूमीवर 10 रुपयांची शिवभोजन हे 5 रुपयांमध्ये देण्यात येत आहे. श्री गणेशा महिला बचत गट संचलित या शिवभोजन केंद्रातर्फे 200 थाळी पार्सल स्वरुपात देण्यात येणार आहेत. उद्घाटनप्रसंगी या केंद्राचे संचालक शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश मस्के, भाऊसाहेब खालकर, संतोष घुगे, शिवसेना नेते पंडितराव कातोरे, प्रेस कामगार नेते प्रकाश उगले, प्रगतशील शेतकरी अशोकराव टिळे, महिला बचत गटाच्या आध्यक्षा शैलाताई म्हस्के, सविता पवार, ग्रामपंचायत सदस्य आकाश म्हस्के, हॉटेलचे संचालक मयूर म्हस्के, पप्पू जाधव, नानू साळवे, पप्पू म्हस्के, नितीन म्हस्के, हिरामण गोसावी, श्याम पठारे, पांडुरंग पवार उपस्थित होते.

First Published on: June 24, 2020 8:33 PM
Exit mobile version