शेतकर्‍यांना सक्तीच्या वसुलीचा ‘शॉक’; महावितरणची दबंगशाही सुरूच

शेतकर्‍यांना सक्तीच्या वसुलीचा ‘शॉक’; महावितरणची दबंगशाही सुरूच

दिंडोरी : वीज वितरण कंपनीनचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी दिंडोरी तालुक्यात सक्तीची वीजबिल वसुली सुरु केली आहे. गतवर्षी महावितरण कपंनीने प्रत्येक ट्रान्सफार्मवरील प्रत्येक शेतकर्‍यांनकडून सक्तीची वसुली केली होती. त्याप्रमाणे आता पुन्हा महावितरण कपंनी प्रत्येक ट्रान्सफार्मवरील शेतकर्‍यांकडून वसुली केली जाणार असल्याने शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

आधीच पावसाने पिकांची वाट लागली असताना आता पिकांना भाव नसल्यामुळे बळीराजापुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यात महावितरण कंपनीने वसुली सुरु केली आहे. वीज वितरण कंपनीचा डीपी बंद करण्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तात्काळ पैसे भरा बंद करण्याचे आदेश आले आहेत, असे मेसेजमध्ये म्हटले आहे. अशा पद्धतीचे दबंगशाही करण्याचे काम वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी करत आहेत. एक बाजूने शासनाकडून वीजबिल काही ठिकाणी माफीची घोषणा होत आहे. सरकारने या सक्तीच्या वसुलीसंदर्भात त्वरित निर्णय घेवून सक्तीची वसुली थांबवावी आशी मागणी शेतकरी वर्गकडून केली जात आहे.

गेल्या अनेक वर्षाच्या तुलनेत तालुक्यात विक्रमी पाऊस होऊन अतिवृष्टी,महापूर, ढगफुटी यांमुळे शेतीतील सोयबीन , टोमॅटो ,वेलवर्णीय भाजीपाल्यासह सर्व पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्यामुळे सध्या शेतक-यांपुढे समस्याचा डोंगर उभा असताना महावितरण कंपनीने विज कनेक्शन कट करून बळीराजाला मोठा झटका दिला आहे.तसेच तालुक्यात गेल्या तीन दिवसा पासून अतिरिक्त भारनियमन चालू झाले आहे सध्या तालुक्यात शेतीसाठी रात्री सात व दिवसा सात असा विजपुरवठा केला जात आहे सर्व ठिकाणी एक तास भारनियमन वाढविले आहे त्यांमुळे शेतक-यांना पिकाना पुरेशे पाणी देता येत नाही. रात्री तर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ असल्यामुळे शेतकरी घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. त्यात सध्या शेतकर्‍यांच्या पिकांना भाव नसताना महावितरण कंपनीने सक्तीच्या वीजबिल वसुलीचे मोठे संकट बळीराजा पुढे उभे केले आहे. अशा परिस्थितीमध्ये जगाच्या पोशिंदा असलेल्या बळीराजाला सरकारने सक्तीची विजबिल वसुली थांबून न्याय दयावा अन्यथा, बळीराजापुढे आत्महत्याशिवाय पर्याय राहणार नाही.

First Published on: November 17, 2022 12:52 PM
Exit mobile version