धक्कादायक! ११ वर्षीय मुलीवर आईच्या ‘लिव्ह इन’ प्रियकराकडून अत्याचार

धक्कादायक! ११ वर्षीय मुलीवर आईच्या ‘लिव्ह इन’ प्रियकराकडून अत्याचार

नाशिक : मंत्रभूमी ते तंत्रभूमी अशी ओळख असलेल्या नाशिक शहरात धक्कादायक घटनेचा उलगडा झाला आहे. ११ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लिव्ह इन रिलेशनशीपमधील प्रियकराने व्हिडीओ काढत चार महिने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना पुणे रोडवरील नासर्डी पुलाजवळील बजरंगवाडीत घडली. विशेष म्हणजे, प्रियकराने दोन मुलांना मुलीवर अत्याचार करण्यास सांगत व्हिडीओ काढल्याचे समोर आले आहे. मुंबई नाका पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने संशयिताला २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. शिवाजी साळवे (30, मूळ रा. जिंतूर, परभणी, सध्या रा. बजरंगवाडी) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार २८ वर्षीय विवाहित महिला परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील आहे. तिला पहिल्या पतीपासून साडेदहा वर्षांची मुलगी असून, पहिल्या पतीचे निधन झाले आहे. त्यानंतर तिने दुसर्‍या पुरुषाची लग्न केले. त्याच्यापासून तिला दोन मुले झाली. दरम्यान, दोघांमध्ये कौटुंबिक वाद झाला. तिने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला असून, ती दुसर्‍या पतीपासून दीड वर्षांपासून विभक्त राहत आहे. घटस्फोटप्रकरण न्यायप्रविष्ठ असताना ती तिसर्‍या पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये नाशिकमध्ये राहू लागली. ती नाशिकमध्ये धुणीभांड्याची कामे करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे.

महिला धुणीभांड्याची कामे करण्यासाठी घराबाहेर गेली की संशयित आरोपी शिवाजी साळवे याने चार महिन्यांपासून तिच्या साडेदहा वर्षांच्या मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करायचा. 1 जानेवारी ते 17 एप्रिल २०२२ या कालावधीत महिला कामावर गेल्यावर घरात कोणी नसल्याची संधी साधून तो तिच्या मुलीवर आणि दोन मुलांवर लैंगिक व अनैसर्गिक अत्याचार करायचा. त्यावेळी तो मोबाईलमध्ये व्हिडीओ काढून घेत होता. . याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात बलात्कार,अनैसर्गिक अत्याचार व पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत करत आहेत.

First Published on: April 19, 2022 4:41 PM
Exit mobile version