धक्कादायक! व्हिडिओ काढत तरुणाची आत्महत्या

धक्कादायक! व्हिडिओ काढत तरुणाची आत्महत्या

नवीन नाशिक – अंबड परिसरातील एका २४ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.८) उघडकीस आली. विशेष म्हणजे या तरुणाने आत्महत्येचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. प्रथमेश प्रकाश बोरसे (वय २४) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबडजवळील निवासी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील घरात प्रथमेशने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण पुढे आलेले नाही. ऐन दिवाळीत तरुणाने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होतेय. याप्रकरणी पुढील तपास पोलीस कर्मचारी पवन परदेशी करत आहेत.

First Published on: November 8, 2021 7:36 PM
Exit mobile version