सिन्नर : जनता विद्यालयाचे विद्यार्थी ३७ वर्षांनी आले एकत्र

सिन्नर : जनता विद्यालयाचे विद्यार्थी ३७ वर्षांनी आले एकत्र

नाशिक : तब्बल ३७ वर्षांनी सिन्नर येथील जनता विद्यालयाचे विद्यार्थी एकत्र आले. १९८५ साली दहावीला असणारे हे मित्रमैत्रिणी 37 वर्षांनी पुन्हा भेटले. या भेटीत काहींना अश्रू अनावर झाले. सिन्नर येथील पंचवटी मोटेलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमांमध्ये काही शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अनेक विषयांच्या शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. समाजशास्त्र विषयाचे शिक्षक एम.आर. शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आपापल्या क्षेत्रात सर्वांनी चांगले काम करावे आणि इतर ज्ञानाबरोबरच आध्यात्मिक ज्ञान मिळवावे. गणिताचे शिक्षक बी. जी. थोरात यांनी आपल्या माजी विद्यार्थ्यांना व्यसनाच्या आहारी जाऊ नये व आरोग्य चांगले राहील अशी काळजी घ्यावी असा सल्ला. बरेच विद्यार्थी भेटतात, शिक्षकांप्रती आदर दाखवतात, एक विद्यार्थी अमेरिकेत बँकेत मोठ्या पदावर आहे. विद्यार्थ्यांना भेटल्यावर आमचे आयुष्य वाढते, शिक्षक रिफ्रेश होतात असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. चित्रकला विषयाचे शिक्षक चव्हाण यांनी देखील आपले मत व्यक्त केले. विद्यार्थी यशस्वी झाले तर शिक्षकांना जास्त आनंद होतो असे ते म्हणाले. इंग्लिशचे शिक्षक कणसे यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांकडून मी खूप शिकलो. शिक्षक हे मुलांना शिक्षा करतात, त्यांचा हेतू चांगलाच असतो. कुटुंबाकडे लक्ष, जेवढे कौटुंबिक स्वास्थ्य जास्त तेवढे आरोग्य चांगले राहते, समाधानातच सुख उपभोग असा कानमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.  विद्यार्थिनींनी केलेली प्रगती खूप प्रशंसनीय आहे. ११५ रुपयांमध्ये वाघा बॉर्डरला मुलांना सहलीसाठी नेले तर १२१ रुपयांत साऊथ इंडियामध्ये सहल नेली. त्यामुळे विद्यार्थ्यांशी ऋणानुबंध तयार होतो. कुणी पीएसआय, टीचर, किराणा दुकानात तर कोणी डॉक्टर, प्रशासनात उच्च पद भूषवित आहे, तर कुणी शेती करत आहे असे म्हणत त्यांनी आपले मत व्यक्त केले.

दीप प्रज्वलनाने प्रारंभ करत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यानंतर प्रत्येकाची ओळख करून दिली गेली, कारण पटकन एकमेकांची ओळख होणे कठीण होते. काहींना टक्कल तर काहींचे केस पांढरे झालेले. त्यानंतर शाळेच्या आठवणी सांगितल्या गेल्या आणि शिक्षकां प्रति ऋण व्यक्त केले गेले. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी खेळ खेळले, डान्स केला, सेल्फी काढल्या. अलका कोतवाल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर उमा पाटील यांनी गीत गायले, संजय दुसाने, अनिल कुंदे आणि श्याम सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्योती भोसले-लांडगे आणि अभिजित यादव हे त्या वेळेला शाळेतील टॉपर होते, अशी आठवण अलका यांनी करून दिली. डॉ. केदार, अशोक आंधळे, डॉ. कैलास शिंगोटे, सतीश कोकाटे, ज्ञानेश्वर नाईकवाडे, तुकाराम कोतकर, विजय अडसरे, अनिल उगले, राजाराम कुर्‍हाडे, संजय सोनवणे, गणेश मुरकुटे, गोविंद शिंदे, बाळासाहेब शेळके, सुनील शेळके, नवनाथ धोमसे, रामदास सानप, दौलत खताळे, आनंद सोनवणे, लहानु रसाळ, निवृत्ती शिंदे, विठा उकाडे हे उपस्थित होते. तर ज्योती भोसले, उमा पाटील, छाया भगत-मुरकुटे, क्रांती उगले-कडलग, मंगल चोरडिया, शोभा भगत तिकोने, सुनिता चव्हाणके-हांडे, शोभा दवंगे यांनी विविध फनी गेम्समध्ये सहभाग घेतला. काही कारणांनी काही लोक येऊ शकले नाही त्यांची आठवण मित्र-मैत्रिणींनी काढली. सर्व विद्यार्थ्यांची प्रगती पाहून शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आणि ३७ वर्षांनी भरलेली शाळा सुटली.

First Published on: June 20, 2022 1:28 PM
Exit mobile version