श्री जैन ओसवाल बोर्डिंगच्या अध्यक्षपदी सोहनलाल भंडारी, सेक्रेटरीपदी शशिकांत पारख

श्री जैन ओसवाल बोर्डिंगच्या अध्यक्षपदी सोहनलाल भंडारी, सेक्रेटरीपदी शशिकांत पारख

नाशिक : शहरातील बहुचर्चित श्री जैन ओसवाल बोर्डिंगच्या अध्यक्षपदी सोहनलाल भंडारी, तर सेक्रेटरीपदी शशिकांत पारख यांनी निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शनिवारी पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा केली.

श्री जैन ओसवाल बोर्डिंगच्या अन्य पदाधिकारी नियुक्तीत खजिनदारपदी अशोक साखला, उपाध्यक्षपदी सुनील बुरड, दिलीप खिंवसरा, सुनील भटेवरा, विजय टाटीया, तर, सहसेक्रेटरीपदी विनोद बेदमुथा, रवींद्र पारख, नवीन बंब यांची नियुक्ती करण्यात आली. अॅड. अभय बोरा, अॅड. संदीप चोरडिया आणि डॉ. लक्ष्मीकांत पाठक या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया झाली.

गेल्या आठवड्यात झालेल्या जैन ओसवाल बोर्डिंगच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोहनलाल भंडारी, शशिकांत पारख, अशोक साखला आणि सुनील बुरड यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण पॅनल भरघोस मतांनी विजयी झाले. प्रगती पॅनलने चैतन्य पॅनलचा पुरता धुव्वा उडवत हा विजय मिळवला.

मतदारांच्या विश्वासाला पात्र ठरत आजवर ज्या गतीने कामं केलीत, त्याच गतीने यापुढेही संस्थेचा विकास सुरू राहील. प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू – शशिकांत पारख, विजयी उमेदवार, प्रगती पॅनल

First Published on: January 1, 2022 5:43 PM
Exit mobile version