स्पुतनिक नाशकात आली रे!

स्पुतनिक नाशकात आली रे!

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. असे असले तरी अद्याप कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. पुढील दोन ते तीन महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे लसीकरणावर भर देण्यात आला असला, तरी लसींचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याने लसीकरणात अडथळे येत आहेत. मात्र, आता परेदशातील लसींनाही मान्यता देण्यात आली असून नाशिकमध्ये रशियाची बहुप्रतिक्षित स्पुतनिक लस उपलब्ध झाली आहे.

सध्या देशात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन या लसींना मंजुरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रशियाची स्पुतनिक व्ही या लसीलाही मंजुरी देण्यात आली आहे. सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन लसींच वितरण करण्यात येत असलं तरी अजुनही लसीचा तुटवडा जाणवत आहे. देशात स्पुतनिक लसींच्या वितरणाला सुरूवात झाली असून नाशिकमध्येही ही लस उपलब्ध झाली आहे. ही लस उपलब्ध झाल्याने कोविड विरोधात लढाईसाठी भारताकडे आता ३ लशी उपलब्ध झाल्या आहेत.

दोन डोसमधील अंतर २१ दिवसांचे

रशियाने विकसित केलेल्या स्पुतनिक लसीच्या दोन डोसमधील अंतर २१ दिवसांचे निश्चित करण्यात आले आहे. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस २१ दिवसानंतर घ्यावा लागणार आहे. स्पुतनिक व्ही लसीच्या एका डोसची किंमत ११५४ रूपये निश्चित करण्यात आली आहे. एका अभ्यासानुसार ही लस कोरोनाविरुद्ध जवळपास ९२ टक्के प्रभावी आहे. मॉस्कोतील गॅमालिया इन्स्टिट्यूटद्वारे ही लस विकसित करण्यात आली आहे.

First Published on: July 9, 2021 10:17 PM
Exit mobile version