उत्पादन शुल्क विभाग घेणार आता चुंभळे यांचा ताबा

उत्पादन शुल्क विभाग घेणार आता चुंभळे यांचा ताबा

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांनी निवासस्थानी बेकायदा विदेशी मद्यसाठा केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा दाखल केला आहे. लाचप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या चुंभळे यांचा ताबा राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी (ता.१९) न्यायालयाकडे मागितला. मद्यसाठा तपासणी करावयाची असल्याने शिवाजी चुंभळे यांचा ताबा मिळावा यासाठी सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तीवाद केला. यावेळी न्यायालयाने त्यांचा अर्ज मंजूर करत तुरुंगधिकार्‍यांना चुंभळे यांचा ताबा देण्याबाबतचे पत्र रवाना केले असल्याने चुंभळे यांचा ताबा आता राज्य उत्पादन शुल्क विभाग घेणार आहे.

First Published on: August 19, 2019 8:45 PM
Exit mobile version