देवळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

देवळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

नायब तहसीलदार विजय बनसोडे यांना निवेदन देतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यशवन्त शिरसाठ , पंडितराव निकम , योगेश आहेर , जितेंद्र आहेर ,उषाताई बच्छाव आदी (छाया - जगदिश निकम )

कांदा निर्यात बंदीमुळे देवळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात येऊन तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनाचा आशय असा की, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. ही निर्यात बंदी त्वरित मागे घेण्यात यावी, मध्यंतरी शेतकऱ्यांनी कांदा कवडीमोल भावाने विकला. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आज थोड्याफार प्रमाणात कांद्याचे भाव वाढले. त्यात केंद्र सरकारने निर्यात बंदी केली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली असून, याची दखल घेऊन हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य यशवन्त शिरसाठ, माजी तालुका अध्यक्ष पंडितराव निकम, माजी जिल्हा परिषद सभापती उषाताई बच्छाव, प्रांतिक सदस्य योगेश आहेर, गटनेते जितेंद्र आहेर, जिल्हा सरचिटणीस जगदीश पवार, निखिल आहेर, गोटू शिंदे, सचिन सूर्यवंशी, सतीश सुर्यवंशी, बाळासाहेब मगर आदी उपस्थित होते.

First Published on: September 17, 2020 4:45 PM
Exit mobile version