चोरीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

चोरीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्ह्यातील जप्त केलेला लाखो रुपयांचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार यांच्या हस्ते मूळ तक्रारदारांना परत करण्यात आले. यात सोन्याचे दागिने, चार चाकी वाहन, मोबाईल आदी वस्तू न्यायालयाच्या आदेशाने परत करण्यात आल्या. यावेळी तक्रारदारांनी पोलिसांचे आभार मानले. ही कामगिरी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे मुद्देमाल कारकून पोलीस हवालदार मारोती उघडे, पोलीस नाईक जावेद खान यांनी केली.

यांना केला मुद्देमाल परत

शितल कुलकर्णी यांना २० ग्रॅम सोन्याची लगड, रंजना विभुते यांना मोबाईल, उमेश कांडेकर यांना महेंद्र कंपनीची बोलेरो पिकअप, अभिजित तेलंग यांना 50 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड आणि विश्वजित देशमुख यांना चारचाकी  वाहन, अभिषेक मंडलिक मोबाईल फोन यांना न्यायालयाच्या आदेशाने  मुद्देमाल परत करण्यात आला.

First Published on: December 1, 2023 2:44 PM
Exit mobile version