जमीन जप्तीची कारवाई थांबवा, शेतकरी संघटनेचे जिल्हा बँकेला आवाहन

जमीन जप्तीची कारवाई थांबवा, शेतकरी संघटनेचे जिल्हा बँकेला आवाहन

इगतपुरी : सोसायटी व बँका कर्ज वसुलीसाठी शेतकर्‍यांच्या जमिनी जप्त केल्या जात आहेत. त्यांचा जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या नैराशात शेतकरी आत्महत्या करत आहे. तर काही इतर आत्मघातकी पर्यायांचा विचार करत आहे. त्यासाठी शासनाने शेतकर्‍यांना ताबडतोब कोर्ट वसुलीच्या माध्यमातून कर्जवसूली थांबवावी, अशी मागणी नाशिक जिल्हा शेतकरी व शेतकरी संघटनेचे(शरद जोशी प्रणीत) जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे व जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब धुमाळ यांनी सहकार मंत्री अतुल मोरेश्वर सावे यांना निवेदनाव्दारे केली आहे.

नोटबंदी, कोरोना, सततच्या अतिवृष्टीमुळे आणि चालू हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आता ही संकटे सोसण्याची सहनशक्ती संपली आहे. ज्या शेतकर्‍यांनी पिकविमा काढलेला होता. त्यांनाही विम्याचे हप्ते मिळाले नाही. शासन सतत शेतीमालावर निर्यात बंदी लावून व शेतीमाल आयात करून शेतीमालाचे भाव हेतूपुरस्कर पाडले जात आहेत. या सर्व अशा परिस्थितिमुळे शेतकर्‍यांचा त्यांचा खर्च वसूल झालेला नाही. यावर्षी कोरोनाचा धोका असूनही गट डिसेंबर महिन्यापासून आता जानेवारी महिन्यातील अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, गहू व इतर पिकांचे भरपूर नुकसान झाले आहे. तोडणीस आलेली द्राक्ष पावसामुळे क्रॅकिंग होऊन द्राक्षबागांचे प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्ष पिकांचे पंचनागे चालू आहे. शेतकरी कर्जबाजारी होऊन हताश झाले आहेत. त्याचा हातात पैसा आलेला नाही. हे शासनाच्या लक्षात आल्याने शेतकर्‍यांना तुटपुंजी नुकसानभरपाई दिलेली आहे. यावेळी बाळासाहेब धुमाळ, प्रदीप पवार, एकनाथ धनवटे, भिमराव बोराडे, बाळासाहेब गायकवाड सुनील भंडारे, आनंदा गायकवाड आदी उपस्थित होते.

First Published on: November 3, 2022 12:46 PM
Exit mobile version