रेशन दुकानदारांच्या संपावर यशस्वी तोडगा

रेशन दुकानदारांच्या संपावर यशस्वी तोडगा

रास्त भाव दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेच्या मागण्यांसदर्भात सोमवारी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांसोबत बैठक यशस्वी झाल्यामुळे रेशन दुकानदारांनी आपला नियोजित संप मागे घेतला आहे. तामिळनाडू राज्याप्रमाणे मानधन किंवा कमिशन देण्याचा विचार राज्य शासन करत आहे. त्याविषयी खासदार रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा करुन लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. तुर्त राज्यात पूरस्थिती गंभीर असल्यामुळे नागरीकांना अन्न पुरवठा करणे गरजेचे असल्याने संपावर तोडगा काढण्यात आला.

परवानाधारक रेशन दुकानदाराच्या प्रलंबित मागण्यांची सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने रेशन दुकानदारांनी 1 सप्टेंबरपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. परंतु, या आंदोलनाची गंभीर दखल घेतली जात नसल्याने व्यावसायिकांता नाराजी बळावली आहे. या पार्श्वभूमिवर सोमवारी मुंबईत पुरवठा मंत्र्यासोबत संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी चर्चा केली. यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर, जनरल सेक्रेटरी बाबुराव ममाने, विभागीय अध्यक्ष गणपत डोळसे, नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे, सचिव माधव गायधनी, संपर्क प्रमुख दिलीप नवले, कार्याध्यक्ष अशोक बोराडे, मालेगाव अध्यक्ष निसार शेख उपस्थित होते.

First Published on: August 26, 2019 8:13 PM
Exit mobile version