स्वामी शंकरानंद सरस्वती त्र्यंबकेश्वर आखाड्याचे उत्तराधिकारी

स्वामी शंकरानंद सरस्वती त्र्यंबकेश्वर आखाड्याचे उत्तराधिकारी

नाशिक : त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांचे ८ ऑक्टोबर रोजी वयाच्या १०२ व्या वर्षी देहवसन झाले होते. त्यानंतर आखाडा परिषदेचे अध्यक्षपद रिक्त झाले होते. सोमवारी (दी.२४) अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष तसेच महामंत्र्यांच्या उपस्थितीत स्वामी सागरानंद सरस्वती महाराजांचे षोडशी सोहळ्यात उत्तराधिकारी  म्हणून महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांची नियुक्ती करण्यात आली.

स्वामी सागरानंद सरस्वती यांनी तब्बल ६ दशक अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते. नाशिक मध्ये पार पडलेल्या १९६८ पासून ते २०१५ पर्यंतचे सर्वच कुंभमेळे स्वामी सागरानंद महाराजांच्या मार्गदर्शनात पार पडले होते. त्याच दरम्यान मागील ५० वर्षाहून अधिक काळापासून महंत शंकरानंद सरस्वती उर्फ भगवान बाबा स्वामी सागरानंद यांच्या सोबत राहिलेले आहेत. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रपुरी महाराज, आखाडा परिषदेचे महामंत्री हरीगिरीजी महाराज, आनंद पीठाधीश्वर आचार्य बालकानंदगिरीजी महाराज यांचे उपस्थितीत ब्रह्मलीन सागरानंद महाराजांची षोडशी समारंभ पार पडला यावेळी पारंपरिक पद्धतीने महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांना स्वामी सागरानंद महाराजांच्या आसनावर बसवण्यात आले. त्यानंतर पारंपरिक विधी संपन्न होऊन त्यांच्या अंगावर चादर ओढण्यात आली. यासर्व समारंभानंतर सर्व सन्मानिय साधू महंतांनी षोडशी संपन्न झाल्याचे घोषित केले. याचसोबत महंत शंकरानंद सरस्वती महाराज आखाडा परिषदेचे नवे अध्यक्ष झाले.

दरम्यान, ‘स्वामी सागरानंंद सरस्वती महाराजांच्या शिकवणीनुसार वाटचाल करू, तसेच आखाड्याचे आणि कुंभमेळ्याचे नाव लौकिक वाढवू’ असे प्रतिपादन नवनियुक्त अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांनी केले.याप्रसंगी, आखाड्याचे पंचपरमेश्वर तथा शिवशक्ती पीठाचे महंत कैलासपुरी, महंत दिवाकरपुरी, महंत भैरवगिरी, महंत काळूगिरी, महंत गणेशानंद सरस्वती, महंत रामानंद सरस्वती, गिरीजानंजानंद सरस्वती, निरंजनी आखाड्याचे ठाणापती धनंजयगिरी महाराज, ब्रह्मदर्शनचे रामानंद सरस्वती महाराज, जुना आखाड्याचे नारायणगिरी महाराज यांच्यासह महिला साध्वी, विविध आखाड्यातील साधू-महंत, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

First Published on: October 24, 2022 5:10 PM
Exit mobile version