महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आत्महत्या

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आत्महत्या

प्रातिनिधिक फोटो

देवळा : तालुक्यातील गुंजाळनगर येथील कल्पेश भाऊसाहेब गुंजाळ (१८) या अकरावीत शिकणार्‍या युवकाने स्वत:च्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे गुंजाळनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

गुंजाळनगर येथील पानसेवाडी शिवारातील कल्पेश भाऊसाहेब गुंजाळ या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने १३ सप्टेंबरला दुपारी १ ते २ वाजेच्या दरम्यान साडीने फंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . पोलीस पाटील योगेश गुंजाळ यांनी या बाबत पोलिसांना खबर दिली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

First Published on: September 14, 2019 7:39 PM
Exit mobile version