नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली; सूरज मांढरे नवे जिल्हाधिकारी

नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली; सूरज मांढरे नवे जिल्हाधिकारी

नूतन जिल्हाधिकारी सूरज मांढरे

लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याच्या काही तासांतच नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांची नियुक्ती झाली आहे.

मावळते जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची मुंबईच्या मेरीटाइम बोर्ड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांनी २ मे २०१६ रोजी नाशिक जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली होती. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीची चर्चा सुरू होती. मात्र, आचारसंहिता लागू झाल्यामुळे त्यांना मुदतवाढ मिळाल्याचेही सांगितले जात होते. रविवारी आचारसंहिता लागू झाल्यानंतर राधाकृष्णन बी. यांनी दोन दिवसांपासून निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व बैठकांना हजेरी लावत निवडणुकीचे कामकाज सुरू केले होते. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात तीन वर्षे पूर्ण करणाऱ्या साधारण १५ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

जिल्हाधिकाऱ्यांपुढील आव्हाने

नवीन जिल्हाधिकार्‍यांसमोर नाशिक जिल्ह्यातील निवडणुका सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पाडण्याचे मोठे आव्हान असणार आहे. तसेच, एकूणच दुष्काळाचे नियोजन करण्याची मोठी कसरतदेखील त्यांना करावी लागणार आहे.

First Published on: March 12, 2019 2:54 PM
Exit mobile version