गायी चोरणाऱ्या टोळीतील संशयित पोलिसांच्या ताब्यात; पाच फरार

गायी चोरणाऱ्या टोळीतील संशयित पोलिसांच्या ताब्यात; पाच फरार

इगतपुरी शहरातील महात्मा गांधी चौक ते विश्व विपश्यना विद्यापीठ या परिसरात मोकाट जनावरांचे वास्तव असते. अनेक दिवसांपासून या भागासह शहरात अनेक ठिकाणाहून जनावरे, गायी चोरणारी टोळीने अनेक गायींना बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देऊन वाहनांमध्ये कोंबून चोरी करून मुंबईच्या दिशेने नेतांना अनेक वेळा स्थानिक युवकांनी पाहिले. त्यांना पकडण्याचा प्रयत्नही केला, मात्र बंदुकीचा व धारदार शस्त्राचा धाक दाखवून ही टोळी जनावरे पळवून घेऊन जात होती. अनेक दिवसांपासून गोवंश चोरी करत असताना स्थानिक युवकांनी त्यांच्या टोळीवर धाड घालत काही गायींची सुटका केली. त्यांचे वाहन अंधारात अडवून दगडफेक केल्याने चोरी करणार्‍या टोळीपैकी एकाला पकडण्यात यश आले. स्थानिक युवकांनी त्या संशयिताला इगतपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलीस गस्त वाहनाने पोलिसांनी या गायी चोरी टोळीचा पाठलाग केला असता त्यात वाहन खड्ड्यात अडकल्याने एका संशयितास पकडण्यात पोलिसांना यश आले. या घटनेतील संशयित आबीद मुनीर शेख (वय ३२, रा. भिवंडी) व गोवंश चोरी करून नेणारी महिंद्रा स्कार्पिओ गाडी (एमएच ०३ झेड ८३०३) या क्रमांकाची निळसर रंगाची स्कार्पिओ गाडी पोलीसांनी ताब्यात घेतली असुन यात गुंगीचे औषधे व इंजेक्शन आदी मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला आहे. तर पाच संशयित पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेतील एक संशयित व जनावरे चोरी करून नेणारे वाहन पोलीसांनी ताब्यात घेत संबंधीताची चौकशी केली असता त्याने आणखी पाच संशयितांची नावे सांगितली.

याबाबात पोलीस पथक तपास करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी दिली. गोवंश चोरीच्या काही घटना इगतपुरी परिसरात घडल्या होत्या त्यातील काही घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाल्या आहेत. गोवंश चोरीसंदर्भात अनेक तक्रारी इगतपुरी पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून इगतपुरी पोलीस या चोरांचा शोध घेत होते मात्र चोरांचा तपास लागत नव्हता.

अशी करत असे चोरी

चोर दिवसा दुचाकीने फिरून कोणत्या ठिकाणी गोपालक त्यांच्या गायी बांधतात याची रेकी करायचे.रात्रीच्या सुमारास दुचाकीवर येऊन त्यांना बेशुद्धीचे इनजेक्शन द्यायचे त्यानंतर पहाटेच्या सुमारास कार नेऊन गाय, त्यांचे बछडे चोरायचे. चोरलेले गोवंश पळवण्यासाठी ही टोळी कारच्या मागील बाजूची सीट काढून तिथे गाईंना क्रूर पद्धतीने कोंबत असत. ही जनावरे बेशुद्ध असल्याने ओरडत नसल्याने कोणाला काही कळायच्या जनावरे घेऊन पोबारा करीत असे.

First Published on: September 22, 2021 7:47 PM
Exit mobile version