मविप्र निवडणुकीत मतपत्रिका गहाळ झाल्याचा संशय

मविप्र निवडणुकीत मतपत्रिका गहाळ झाल्याचा संशय

मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या निवडणुकीत वाद व्हायला सुरुवात झाली आहे. इगतपुरी तालुक्यात १३१ सभासदांचे मतदान झाले. मात मतमोजणीपूर्वी गठ्ठे तयार करत असताना त्यामध्ये एक मतपत्रिका कमी असल्याचे आढळून आले. मतपत्रिकांची मोजणी केली असता त्यात १३१ मतपत्रिका असल्याचे निदर्शनास आले. अशीच परिस्थिती दुसऱ्याही टेबलवर घडली. त्यात अध्यक्षपदाची एक मतपत्रिका गहाळ असल्याचे समोर आले होते. उपाध्यक्ष, सभापती आणि उपसभापती यांच्या प्रत्येकी एक अशा तीन चिठ्ठ्या नसल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. उमेदवारांनी याबाबत तक्रार केली आहे. चिठ्ठ्या सापडल्याशिवाय मतमोजणीस प्रारंभ करु नये अशी मागणी देखील उमेदवारांनी केली आहे. त्यामुळे काहीसा तणाव निर्माण झाला आहे. ही निवडणूक अतिशय चुरशीची होत असल्याने एक-एक मताला महत्व आहे. शिवाय एक मतपत्रिका गहाळ झाली म्हणजे मतदानानंतर कुणीतरी मतपत्रिकांमध्ये गडबड केली असा संशय व्यक्त केला जात आहे.

 

First Published on: August 29, 2022 3:01 PM
Exit mobile version