‘त्या’ विवाह लावणार्‍या संस्थेवर कारवाई करा; जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

‘त्या’ विवाह लावणार्‍या संस्थेवर कारवाई करा; जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

पंचवटी : पंंचवटी परिसरातील श्री राम वैदिक विवाह संस्थेच्या कार्यालयात सप्टेंबर महिन्यात झालेल्या आंतरधर्मीय विवाह प्रकरणात विवाह करणार्‍या मुस्लिम समाजाचा मुलगा आणि विवाह लावणार्‍या संस्थेवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीचे नाशिक मधील राजपूत समाज बांधव तसेच हिंदुत्ववादी संस्था, संघटना यांच्या वतीने नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, नाशिक जिल्हाधिकारी, नाशिक पोलिस आयुक्त, नाशिक महापालिका आयुक्त यासह धर्मादाय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.

श्रीराम वैदिक विवाह काळाराम मंदिर उत्तर दरवाज्याजवळ पंचवटी येथे उमेश (गिरीश) अरविंद पुजारी यांनी नियाज अब्बास शेख वय ३० वर्ष व प्रीती लक्ष्मण परदेशी वय १८ वर्ष यांचा वैदिक पद्धतीने विवाह त्यांच्या संस्थेत लावून दिला व त्यांना वैदिक पद्धतीने विवाह झाल्याचे प्रमाणपत्र दिले. हा विवाह हा लवजिहाद प्रकारचा असताना, तो विवाह वैदिक पद्धतीने झाला आहे असे गिरीश पुजारी यांनी प्रमाणपत्रावर लिहून दिले आहे. वैदिक पद्धतीने विवाह हा फक्त हिंदू धर्मियांमध्ये लावला जातो.

या विवाहातील मुलीस फूस लावून चुकीची माहिती देऊन सदर चा विवाह गैरमार्गाने बेकायदेशीरपणे लावलेला आहे. नियाज शेख व गिरीश पुजारी यांनी हिंदुधर्माची फसवणूक केल्यामुळे यांना अटक करण्यात यावी. मुलगा हिंदू धर्मीय नसल्याने कायद्याची पायमल्ली करून सदर विवाह लावला आहे. तरी सर्व संबंधितांवर कायद्याप्रमाणे कडक कारवाई करण्यात यावी तसेच अश्या पद्धतीने बेकायदेशीर विवाह लाऊन देणार्‍या सर्व विवाह संस्थांची चौकशी करून त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात यावी. पालकमंत्री दादा भुसे यांनी योग्य ती कारवाई करावी करण्याचे आश्वासन दिले. भविष्यात अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे विवाह लावले जाणार नाहीत, याबाबत उपाययोजना करावी. यावेळी रामसिंह बावरी, ड. कनोजे, बबलू परदेशी, वीरेंद्र टिळे, सुनील परदेशी, किरण राजपूत, भावेश परदेशी, अरुण चव्हाण, शांताराम परदेशी, धनसिंग परदेशी, बंडू परदेशी, विजय परदेशी, प्रमिल परदेशी, राजेश परदेशी, रुपेश परदेशी उपस्थित होते.

First Published on: November 15, 2022 12:19 PM
Exit mobile version