शिक्षक बदलीची प्रक्रिया सुरु

शिक्षक बदलीची प्रक्रिया सुरु

दोन वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया आता सुरु झाली आहे. त्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत रोष्टर अद्ययावत करण्याचे काम प्राथमिक शिक्षण विभागाने सुरु केले आहे.
ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदलीस हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यासंदर्भात जिल्हा परिषदेला सूचना दिल्या असून, ऑनलाईन पध्दतीने ही प्रक्रिया यंदाही राबवली जाणार आहे. यापूर्वी आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचे चार टप्पे प्रशासनाने यशस्वीपणे राबवले आहेत. मात्र, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून आंतर जिल्हा बदली प्रक्रियेचा पाचवा टप्पा प्रलंबित आहे. ही बदली प्रक्रिया राबवण्याची मागणी शिक्षकांकडून सातत्याने होत होती. त्याआधारे ग्रामविकास मंत्री हनस मुश्रीफ यांनी बदली प्रक्रियेचे आदेश दिले आहेत. 2022 मध्ये शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली ऑनलाईन पध्दतीने करण्यासाठी सॉफ्टवेअर कंपनीची नियुक्ती केली. या कंपनीने बदल्यांसदर्भात कार्यवाही करण्यासाठी कार्यपध्दती सुरु केली आहे. चालू वर्षी प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्यांच्या अधिपत्याखालील प्राथमिक शिक्षकांच्या पुढील माहितीची तत्काळ अद्ययावत करण्याची सूचना दिल्या आहेत. यामध्ये बिंदुनामावली तपासणी करुन घ्यावी, रोष्टर तपासणी करुन घेतलेल्या संवर्गनिहाय रिक्तपदांची यादी घोषित करावी.
शिक्षकांचे संमतीपत्र घेणार
आंतरजिल्हा बदलीत शिक्षकांना स्वखुशीने पदावन्नत करण्याबाबत दिलेल्या संमतीपत्राचा प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांना विचार करावा लागेल. तसेच अर्ज करणारे शिक्षक हे अनुसूचित जमाती (एसटी) संवर्गातील आहेत किंवा नाही याचा प्रामुख्याने विचार केला जाणार आहे.

First Published on: January 25, 2022 12:32 PM
Exit mobile version