डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयास कोटी रुपये देण्याची मागणी

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयास कोटी रुपये देण्याची मागणी

नाशिक : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉ.झाकिर हुसेन रुग्णालयातील मुलभूत सुविधा वाढवण्यासाठी दोन कोटी रुपये निधी देण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली आहे.

संगमनेर येथे नाशिक शहर व जिल्हा काँग्रेसची डिजिटल सभासद नोंदणी मोहिमेबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी नाशिक जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी मंत्री थोरात यांच्याकडे ही मागणी केली.

या रुग्णालयात १५२ बेड असून या ठिकाणी संभाव्य परिस्थिती लक्षात घेता आणखी बेड वाढविण्यासाठी तसेच डिजिटल सिटीस्कॅन, सोनोग्राफी, एक्स-रे, वार्मर आदी मशिनीची सुविधा नसल्याचेही नमुद केले. त्यामुळे नागरिकांची मोठी धावपळ होत असून या ठिकाणी डिजिटल सिटीस्कॅन, सोनोग्राफी, एक्स-रे, लहान मुलांसाठी वार्मर मशीनसह हे रुग्णालय प्रशस्त असल्याने आणखी बेड वाढविण्यासाठी दोन कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. यावेळी ईशाक कुरेशी, संजय खैरनार, बबु शेख, राकेश चवळे, अमोल मरसाळे होते.

First Published on: January 17, 2022 8:12 AM
Exit mobile version