डॉक्टरने परिचारिकेवर केला बलात्कार

डॉक्टरने परिचारिकेवर केला बलात्कार

धक्कादायक! मुंबईत लिफ्टमॅनने 10 वर्षीय मुलीचा केला विनयभंग

नवीन नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर डॉक्टरने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. डॉ. उल्हास पांडुरंग कुटे (५०रा.मोरवाडी) असे संशयित डॉक्टरचे नाव आहेे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. उल्हास कुटे हा शनिवारी (दि.१०) रात्री 10.30 वाजेच्या सुमारास त्याच्या खासगी हॉस्पिटलमध्ये गेला होता. त्याने या ठिकाणी राहणार्‍या प्रशिक्षणार्थी परिचारिकेला बोलावले. त्याने खोलीत ती एकटी असल्याची संधी साधत हातपाय दुखत असल्याच्या निमित्त करत तिच्या खोलीत प्रवेश केला. त्याने दरवाजाची कडी लावून तिच्याच्यावर बलात्कार केला. त्यानंतर झालेला प्रकार कोणाला सांगितल्यास पीडितेला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली.

प्रकरणी पीडित परिचारिकेने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस संशयित आरोपी डॉ.उल्हास कुटे याच्याविरोधात लैंगिक अत्याचार संरक्षण पोस्ट कायद्याअंतर्गत तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख, महिला पोलीस उपनिरीक्षक सोनल फडोळ करीत आहेत.

First Published on: September 13, 2022 2:04 PM
Exit mobile version