मविप्र निवडणुकीचा अंतिम निकाल रात्री १० वाजेनंतरच येणार हाती

मविप्र निवडणुकीचा अंतिम निकाल रात्री १० वाजेनंतरच येणार हाती

मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या निवडणुकीतील प्रत्यक्ष मतमोजणीच्या प्रक्रियेला विलंब झाल्याने अंतिम निकाल रात्री १० वाजेच्या पुढेच हाती येतील असे बोलले जात आहे.
९ वाजेच्या आत जाहीर करण्याच्यादृष्टीने निवडणूक मंडळाने नियोजन केले होतेे. मराठा हायस्कूलच्या प्रांगणातील कै. तुकाराम रौंदळ सभागृहात २४ टेबलांवर एकाच वेळी मतमोजणी प्रक्रिया सुरु आहे. मविप्र निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. भास्कर चौरे, सदस्य रामदास खांदवे, अ‍ॅड. महेश पाटील व संस्थेचे ए. टी. खालकर यांनी मतमोजणी ठिकाणांची पाहणी करुन लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. २०१७ च्या निवडणुकीत सरचिटणीसपदाचा निकाल सर्वात शेवटी म्हणजे साधारणत: ११.३० वाजता जाहीर झाला होता. त्यातही फेरमोजणीचा अर्ज दाखल झाल्यास अंतिम निकालासाठी मध्यरात्र होऊ नये, यासाठी यंदाच्या मतमोजणी प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. एकूण २४ जागांसाठी मतदान होणार असल्याने त्यादृष्टीने २४ टेबलवर मतमोजणी होईल. तत्पूर्वी, तालुक्यातील सर्व मतपेट्यांमधील मतपत्रिका एकत्रित केल्या जातील. एकत्रित झालेल्या मतपत्रिकांमधून रंगनिहाय मतपत्रिका वेगळ्या केल्या जातील. या प्रक्रियेला साधारणत: दुपारचे तीन वाजतील. अपेक्षेपेक्षा प्रक्रियेला विलंब झाल्याने आता अंतिम निकाल रात्री दहा वाजेच्या पुढेच हाती येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

First Published on: August 29, 2022 2:44 PM
Exit mobile version