राज्यातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प लासलगावी कार्यान्वित

राज्यातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प लासलगावी कार्यान्वित

महावितरणच्या जागेतील राज्यातील सर्वात मोठा १.३ मेगावॅट क्षमतेचा लासलगाव येथील सौरऊर्जा प्रकल्प.

कृषीपंपांना दिवसा वीज मिळावी, या शेतकर्‍यांच्या बहुप्रतीक्षित मागणीची पूर्ततेसाठी सरकार आणि महावितरणकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. त्यातील ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेंतर्गत स्व:मालकीच्या जागेवरील महावितरणचा राज्यातील सर्वात मोठा सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प लासलगाव येथे नुकताच कार्यान्वित करण्यात आला. जिल्ह्यात सध्या ३ प्रकल्पांमधून ३ मेगावॅटपेक्षा अधिक सौरऊर्जा निर्माण होत आहे. लासलगाव व परिसरातील कांदा, द्राक्ष यासह इतर पिकाना या योजनेचा फायदा होणार आहे.

राज्यात महावितरणकडून वितरित होणार्‍या एकूण वीज वापरापैकी जवळपास ३० टक्के वीज कृषीपंपासाठी वापरली जाते. महावितरणकडून सवलतीच्या दरात ही वीज शेतकर्‍यांना उपलब्ध करून देण्यात येते. पारंपरिक पद्धतीने सध्या कृषीपंपांना चक्रकार पद्धतीने दिवसा ८ तर रात्री १० तास वीज पुरवठा होतो. दिवसा वीज उपलब्ध करून देण्याची शेतकर्‍यांची अनेक दिवसांपासूनची मागणी, तसेच कृषी क्षेत्राला माफक दरात व आवश्यकतेनुसार वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हाती घेतली. महानिर्मिती व महाऊर्जा यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक व खासगी सहकार्यातून या योजनेतील प्रकल्प कृषिपंप वापर अधिक असलेल्या ठिकाणी उभे राहत आहेत. सरकारी, गावठाण, शेतकर्‍यांच्या खडकाळ व पडीक जमीनी आदी ठिकाणी प्रकल्प उभे केले जात आहेत. याशिवाय महावितरणच्या उपकेंद्र तसेच इतर ठिकाणी असलेल्या जागेवरही प्रकल्प उभारण्यात येत आहेत.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये व लाभ

First Published on: May 18, 2019 11:45 PM
Exit mobile version