थंडीतील नवा ट्रेंड, स्वेटरपेक्षा जॅकेट्सला अधिक पसंती

थंडीतील नवा ट्रेंड, स्वेटरपेक्षा जॅकेट्सला अधिक पसंती

प्रमोद उगले । नाशिक

यंदा हिवाळ्याची चाहूल सरासरीपेक्षा १५ ते २० दिवस आधीच लागली आहे. त्यामुळे शहरात उबदार कपड्यांनाही चांगली मागणी वाढली आहे. विशेष म्हणजे यंदा स्वेटर्सपेक्षा उबदार जॅकेट्सला सर्वाधिक पसंती लाभते आहे. हिवाळा लवकर सुरू झाल्याने उबदार कपड्यांच्या मागणीतही वाढ झाली आहे. शहरातील शालिमार, मेनरोड, रविवार कारंजा परिसरात उबदार कपड्यांची दुकाने थाटली आहेत. दोन दिवसांपासून राज्यभरात थंडीचा जोर वाढला असून, थंड हवेसाठी प्रसिद्ध नाशिकचेही तापमान २४ अंशांखाली आले आहे. त्यामुळे थंडीपासून संरक्षणासाठी ऊबदार कपड्यांना मोठी मागणी आहे. हिवाळ्यातील ऊबदार कपडे आणि विविध प्रकारच्या आधुनिक स्वेटरच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लहान-मोठे व्यावसायिक सरसावले असल्याचे दिसून येते. यंदा नागरिकांमध्ये जॅकेट्सची मोठी क्रेझ दिसून येत आहे.

नाशिकला गरम कपड्यांची आवक, राजस्थान, गुजरातसह पंजाबमधील लुधियाना येथून होत असते. स्वेटर खरेदीसाठी तरुणाई महाग व फॅशनेबल कपड्यांना पसंती देताना दिसते. तरुणाई एकत्रितपणे खरेदीसाठी येत असल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे दुकानेही गजबजली आहेत. बाजारपेठेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटासाठ विविध डिझाईन्सचे स्वेटर व जॅकेट्स उपलब्ध आहेत. जेन्ट्स-लेडीज स्वेटर, मफलर, स्कार्फ, कुर्ता पॅटर्न, जॅकेट्स, टी-शर्ट, जेन्ट्स मास्क फॅन्सी स्वेटर, हॅन्ड ग्लोव्हज्, महिलांचे स्टोल, शॉल, सॉक्स, कानटोपी, हातमोजे, कानपट्टी, टोपी, कॅप्सलाही मागणी आहे. लहान बालकांसाठी ३० रूपयांपासून जवळपास १० हजारांच्या जॅकेटपर्यंत वस्तू बाजारात आहेत. याशिवाय १५०, २००, २५०, ५०० रूपयांपर्यंत चांगल्या प्रतीचे गरम कपडेही उपलब्ध आहेत. थंडीसोबत उबदार कपड्यांचीही मागणी आता वाढत जाणार आहे.

यंदा सुरुवातीपासूनच ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभतो आहे. स्वेटरपेक्षा यंदा जॅकेट्सला पुरुषांची अधिक मागणी आहे. तर, महिलांची यंदा फॅन्सी स्वेटरला अधिक पसंती मिळते आहे. : पवन प्रजापत,विक्रेता

किमतीही वाढल्या

First Published on: November 21, 2022 1:23 PM
Exit mobile version