कौतुकास्पद ! पोलीस अधिकार्‍याच्या पत्नीने भाजीमार्केटमध्ये सापडलेली सोन्याची चेन केली परत

कौतुकास्पद ! पोलीस अधिकार्‍याच्या पत्नीने भाजीमार्केटमध्ये सापडलेली सोन्याची चेन केली परत

रस्त्यावर चालत असताना पैसे पडलेले दिसताच अनेकजण ते उचलून खिशात ठेवतात. मात्र, पोलीस अधिकार्‍याच्या पत्नीने रस्त्यावर पडलेली सोन्याची चेन उचलून घेतली खरी पण सामाजिक बांधिलकीतून ती चेन पोलिसांच्या स्वाधीनसुद्धा केली. पोलीस अधिकार्‍याच्या पत्नीने प्रामाणिकपणे सोन्याची चेन परत केल्याने गुरुवारी (दि.२३) पोलिसांनी त्यांचे कौतुक करत सत्कार केला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या पत्नी कल्पना न्याहाळदे गुरुवारी (दि.२३) भाजीपाला खरेदीसाठी आकाशवाणी भाजीमार्केटमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना रस्त्यावर सोन्याची चेन दिसली. ही बाब त्यांनी पती नारायण न्याहाळदे यांनी सांगितली. त्यांनी पत्नी तत्काळ गंगापूर पोलीस ठाण्यात चेन जमा करण्यास सांगितले. त्यानुसार कल्पना न्याहाळदे यांनी गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ती चेन पोलीस ठाण्यात जमा केली. त्यानिमित्त त्यांचा पोलिसांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

First Published on: September 23, 2021 8:21 PM
Exit mobile version