नाशकात भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट; दुकानातून कपडे लांबविले

नाशकात भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट; दुकानातून कपडे लांबविले

(फोटो प्रातिनिधिक आहे)

नाशिक शहरात भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. कपड्याच्या दुकानात प्रवेश करत चोरट्याने १८ हजार रुपये किंमतीचे कपडे चारून नेल्याची घटना ममता कलेक्शन, मेन रोड, शालिमार येथे घडली. याप्रकरणी नितीन माणिक कुकरेजा यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार नितीन कुकरेजा यांचे मेनरोडला कपड्याचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाचा एक भाग पडलेला असून त्याचा गैरफायदा घेत चोरटयाने १४ ते १७ डिसेंबर दरम्यान दुकानात प्रवेश केला. चोरट्याने दुकानातील १० हजार रुपये किमतीचे कपडे, ५ हजार रुपये किंमतीचा टीव्ही, ३ हजार रुपये किंमतीचा फॅन असा एकूण १८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. पुढील तपास पोलीस हवालदार एन. बी. जाधव तपास करत आहे.

First Published on: December 18, 2020 1:58 PM
Exit mobile version