चूल पेटवताना साडीला लागला जाळ; महिलेचा मृत्यू

चूल पेटवताना साडीला लागला जाळ; महिलेचा मृत्यू

चूल पेटवताना साडीचा पदर जाळ लागल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.) सायंकाळी ७.३० वाजेदरम्यान चुंचाळे शिवारात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ललिता यशवंत पालखे (वय ३६, रा. चुंचाळे शिवार, जाधव संकुल, भवर टाऊनशिप, नाशिक) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ललिता पालखे या राहत्या घरी चूल पेटवित होत्या. त्यावेळी त्यांच्या साडीच्या पदरला जाळ लागला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारार्थ कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस हवालदार वाणी करत आहेत.

First Published on: February 3, 2022 3:48 PM
Exit mobile version