राजकीय वादातून थेट गावाचा पाणीपुरवठा केला उध्वस्त; ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण

राजकीय वादातून थेट गावाचा पाणीपुरवठा केला उध्वस्त; ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण

सुरगाणा : राजकीय वादातून तालुक्यातील मांधा येथे पिण्याचे पाणी पुरवठा करण्यात येणार्‍या बोरवेलचे कनेक्शन तोडण्यात आले आहे. नवनिर्वाचित सरपंच मीरा तुळशीराम महाले व सदस्य तुळशीराम चिमण महाले यांच्या आदेशावरून गावातील मनीराम काळू जाधव, रमेश मनशेर सुकडीया, देवू नवशू गावित या नागरिकांनी ग्रामपंचायत मांधापैकी पवारपाडा येथील राजकीय वादातून बोरवेलचे कनेक्शन तोडण्यात आले. तसेच, तीन हजार लिटर पाण्याची टाकी चौथर्‍यावरून लोटून देत नळ कनेक्शन तोडले असून, गावातील नागरिकांना दमदाटी करण्यात आली आहे.

याप्रकरणी अरविंद गावित व ग्रामस्थांनी सुरगाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र, आतापर्यत आरोपीवर कोणतीही कायदेशीर कोणतेही कार्यवाही झालेली नाही. परिणामी, तहसिलदार सुरगाणा, गटविकास अधिकारी सुरगाणा, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, सुरगाणा यांच्या परवानगीने 31 ऑक्टोबर 2022 रोजी मांधा ग्रामपंचायतमधील ग्रामस्थांनी पंचायत समिती, सुरगाणासमोर बेमुदत उपोषण करण्यात आले.

यामध्ये संगीलाल पवार, अरविंद गावित, हरिश थोरात, ईश्वर पवार, वर्षा गायकवाड, मोहना गावित, सुमन चौधरी, चंद्रकला गायकवाड, जीवली गावित, मंगला गावित ,सीताराम गायकवाड, दिलीप पवार, रामदास चौधरी, हरेस वाघमारे, भरत गायकवाड, कंचन देशमुख, भावना देशमुख, अब्रत देशमुख, विजय देशमुख, रंजना गावित, जणू गायकवाड, लली गावित, सुकरी गायकवाड, भीमा गायकवाड, लवगी गायकवाड, मोहना जाधव, निर्मला वाघमारे,खुराज्या पवार, योगेश पवार, जीवल्या पवार, त्रंबक गायकवाड, जगदीश गायकवाड, हिरामण ठाकरे, राम अलबाड सहभागी झाले होते. जो पर्यंत संबंधित आरोपींवर शासकीय गुन्हा दाखल होऊन नळ पाणी पुरवठा योजना पूर्ववत होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. यावेळी गटविकास अधिकारी, पंचायत समिती सुरगाणा, पोलीस निरीक्षकांनी दोषींवर कायदेशीर कार्यवाही केली जाईल. नळपाणी पुरवठा पूर्ववत केला जाईल, असे लेखी आश्वासन देत उपोषण मागे घेण्यासाठी आवाहन करण्यात आले.

First Published on: November 3, 2022 12:51 PM
Exit mobile version