लखमापूर औद्योगिक वसाहतीतून ५ लाखांचा ऐवज लंपास

लखमापूर औद्योगिक वसाहतीतून ५ लाखांचा ऐवज लंपास

दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील औद्योगिक वसाहतीतील सालासार कंपनीतून ४ लाख रुपयांच्या विविध प्रकारच्या ५६ बेअरिंग, ५० हजारांचे तांब्याचे बुश, ५० हजाराचे तांब्याची पट्टी बंडल असा एकूण ५ लाख रुपयांचा ऐवज ४ संशयीतांनी सुरक्षारक्षकाला लाकडी दांडक्याचा धाक दाखवत लुटून नेल्याने चार संशयीतांविरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लखमापूर शिवारात विविध प्रकारच्या औद्योगिक कंपन्या व कारखाने आहेत. चोरांचा ठराविक कालावधीनंतर सातत्याने यांचा उपद्रव सुरु आहे. यामुळे याठिकाणी कार्यरत औद्योगीक क्षेत्र दबाव व तणावाखाली असते. प्रविण रोशनलाल गौतम (रा. प्लाट नंबर ७, न्यू पंडित कालनी अपार्टमेंट, सायकल सर्कल, कृषीनगर नाशिक) यांचे मालकीची सालासर ही कंपनी लखमापूर शिवारात आहे. या ठिकाणी कंपनीच्या सुरक्षिततेसाठी टुनटुन भुवनेश्वर सिंग, लक्ष्मण निवृती मेसट हे दोन सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. कंपनीच्या सुरक्षेची जबाबदारी ते पार पाडत असताना अंदाजे ३० ते ३५ वर्षाचे चार संशयीत यांनी लाकडी दांडक्यासह या ठिकाणी प्रवेश केला व सुरक्षारक्षकांना लाकडी दांडक्याने जीवे मारण्याची धमकी देत एका खोलीत बंद केले व कंपनी गोडावूनमधून नमूद ऐवज लांबवून जबरी लूट केली. कंपनीचे मालक प्रविण यांना ही माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली व याबाबत पोलिसांत तक्रार केली. संगनमताने जबरी लुटीचा गुन्हा अज्ञात संशयीतां विरोधात दाखल केला आहे.

First Published on: August 14, 2021 11:30 AM
Exit mobile version