तुर्तास शहरात लोडशेडिंग नाही, ‘ते’ वायरल वेळापत्रक पाच वर्षापूर्वीचे

तुर्तास शहरात लोडशेडिंग नाही, ‘ते’ वायरल वेळापत्रक पाच वर्षापूर्वीचे

load shedding

नाशिक : महावितरणच्या नाशिक शहर विभाग एक अंतर्गत येणाऱ्या भारनियमनाचे बनावट वेळापत्रक सोशल मीडियावर वायरल झाले असून सदर वेळापत्रक फेक असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे रहिवासी भागातील भारनियमनाचे कुठले वेळापत्रक सद्यस्थितीत महावितरणच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले असून ग्राहकांनी अनधिकृत माहितीवर व अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन महावितरणने केले आहे.

सध्या राज्यात कोळशाचा निर्माण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे विजेच्या मागणीबाबत देशभरात सध्या अभूतपूर्व संकटाची परिस्थिती आहे. विजेची वाढती मागणी व कोळश्याभावी अपुऱ्या वीज निर्मितीमुळे विजेची तूट भरून काढण्यासाठी गरजेनुसार वीज वाहिन्यांवर विजेचे तात्पुरते भारनियमन करावे लागत आहे. त्यानुसार राज्यातील काही भागात लोडशेडींग करण्यात आले आहे, असे असताना नाशिक मधील काही भागात भारनियमन होणार असल्याचे वेळापत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाले, त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

मात्र वेळापत्रक बनावट असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेले वेळापत्रकावर नाशिकमधील काही भागांचा उल्लेख आहे. या वेळापत्रकात नाशिक मधील विभाग ०१ अंतर्गत येत असलेल्या विविध भागात दिवसभरात विविध वेळेमध्ये तीन ते साडेतीन तास भारनियमन होणार असून शहरातील विविध भागातील दिवसनिहाय वेळापत्रक सुद्धा या बनावट जाहीर सुचना मध्ये देण्यात आलेले आहे. मात्र महावितरणच्या वतीने भारनियमनाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्या नसून सदर माहितीमुळे ग्राहकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो. मात्र ग्राहकांनी या वेळापत्रकावर तसेच अफवांवर विश्वास न ठेवता सामाजिक माध्यमावर माहितीची खात्री करूनच पुढे पाठवावी. जेणेकरून गैरसमज व संभ्रम निर्माण होणार नाही, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

First Published on: April 16, 2022 4:43 PM
Exit mobile version