एकमेव असलेल्या स्मशानभूमिकडे जाण्यासाठी वाटच नाही; नांदगावकरांनी काढली तिरडीयात्रा

एकमेव असलेल्या स्मशानभूमिकडे जाण्यासाठी वाटच नाही; नांदगावकरांनी काढली तिरडीयात्रा

नांदगाव : शहरातील एकमेव असलेल्या समशानभूमीकडे जाणार्‍या रस्त्यावर पुलासह रस्ता व्हावा, यासाठी लक्ष वेधण्यासाठी दि.24 रोजी तिरडीयात्रा व प्रतिकात्मक सरणावर बसून आंदोलन करण्याचा इशारा तुम्ही-आम्ही नांदगावकरांच्या वतीने देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील मुख्य स्मशानभूमी असलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने अंत्यविधीसाठी जाणार्‍या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच रस्त्याला एकलव्य वस्ती, वडाळकर वस्ती, पठाडे वस्ती आदी नागरी वसाहती असून आदिवासी बांधवांच्या वस्तीकडे जाणार्‍या रस्त्याची चाळण झाली आहे. शाकांबरी नदीतून जाताना पूल नसल्याने पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागत असल्याच्या घटना नित्याच्याच आहेत. पूल नसल्यामुळे नदीपात्रातूनच मार्ग काढावा लागतो. याविरोधात लक्ष वेधण्यासाठी तिरडीयात्रा व प्रतिकात्मक सरणावर बसून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आल्याने प्रशासकीय यंत्रणेला त्याची दखल घ्यावी लागेल असे दिसते. विवेक हॉस्पिटल ते स्मशानभूमी रस्ता अशी तिरडीयात्रा काढण्यात येणार असल्याचे तुम्ही-आम्ही नांदगावकरांच्या वतीने वाल्मिक टिळेकर, संतोष गुप्ता, विशाल वडघुले, सागर आहेर, प्रविण सोमासे, अनिल आहेर यांनी दिला आहे.

First Published on: November 21, 2022 12:35 PM
Exit mobile version